भुसावळ- आयएसयेएस या इंटरनॅशनल स्कूल ऑफ अस्थेटिक अँड स्पा यांच्यातर्फे आयोजित ब्रायडल मेक अप कॉम्पिटिशन 22 ते 26 मार्च दरम्यान दुबईत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 22 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामध्ये भुसावळ येथील पर्ल ब्युटी केअर अँड स्पा अकॅडमीच्या सुषमा नेमाडे यांचाही सहभाग होता. त्यांना स्पेर्धेत 25000 हजारांची रोख पारीतोषिक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
22 स्पर्धकांचा सहभाग
दुबईतील स्पर्धेत मुंबई, पुणे, अहमदाबादसह एकूण 22 ठिकाणच्या स्पर्धंकानी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात ब्युटी थेरपीचे शिक्षण घेऊन पुणे येथील सिडिस्को इन्स्टिट्यूटधमध्ये स्विर्झलँडच्या झुरीच युनिव्हर्सिटीच्या स्टडीज याट कोमिट इंटरनॅशनल डी.इथिक डी.कॉस्मेटोलोजी झुरीचचा मेकअप आर्टिस्ट कोर्स केलेला असल्याने आणि आता अहमदाबाद इंटरनॅशनल ब्युटी स्कूलमध्ये मेकअप आर्टिस्टचे पुढील शिक्षण सुरू असल्याने त्यांना या स्पर्धेत सहभागी होता आले. जळगाव जिल्ह्यातून अशा प्रकारचे पारीतोषिक मिळविणार्या सुषमा नेमाडे या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्या माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या पत्नी आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भक्ती शाह, संतोष सपके, जयश्री गोंदालिया, पायल पाध, फराद पठाण यांचे मार्गदर्शन लाभले.