दुबार देयके काढल्याचे विरोधकांनी सिद्ध करावे, आमदारकीचा राजीनामा देईल-आमदार रघुवंशी

0

नंदुरबार। शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील आसन व इतर कामांचेच काय, नगरपालिकेतील कोणत्याही कामांचे दुबार देयके काढल्याचे विरोधकांनी सिद्ध करुन दाखवल्यास नगराध्यक्षसह मी देखील आमदारकीचा राजीनामा देईन, अशी स्पष्टोक्ती विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ही माहिती दिली.

भाजपा नेते प्रा. डॉ. रवींद्र चौधरी यांनी शिवाजी नाट्यमंदिरातील आसन आणि इतर कामांवर दोन वेळा खर्च दाखवून आ,रघुवंशी यांनी जनतेच्या पैशातून उधळपट्टी केली आहे,असा आरोप भाजपचे डॉ,रवींद्र चौधरी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे,नगर पालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे देखील त्यानी म्हटले आहे, त्यावर खुलासा करतांना आ,चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की,रवींद्र चौधरी यांनी अपूर्ण माहितीच्या आधारे केलेले आरोप निराधार आहेत,उलट गेल्या वर्षी नाट्यमंदिर आसन आणि इतर कामांच्या दुरुस्ती साठी आपण मागणी केल्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावणे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, त्याचप्रमाणे 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जो आरोप केला होता, व त्या बाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्या देखील जिल्हाधिकारी यांनी निकाली काढल्या आहेत,हे देखील कदाचित विरोधकांना माहीत नसेल, म्हणून कोणताही आरोप करतांना ठोस पुरावा देऊनच करावा,केवळ प्रसिद्ध साठी आटापिटा करू नये असा टोला आ,चंद्रकांत रघुवंशी यांनी डॉ, रवींद्र चौधरी याना लगावला आहे.

रवींद्र चौधरी व भाजपा नगरसेवकांनी पालिके संदर्भात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कडेही तक्रारी केल्या परंतु, आपल्याच पक्षात आपली डाळ शिजत नसल्याचे पाहुन त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पालिकेत 200 कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ते करतात पण, अजून पर्यंत 200 कोटींची कामे झाले नाहीत तर दोनशे कोटींचा भ्रष्टाचार होणारच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पोलीस, महसूल विभागाने अतिक्रमणे काढावीत

अतिक्रमण हा लोक सेवकासाठी घातक कायदा आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सभेत शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या विषय मंजूर करण्यात आला. पालिकेचे पथक ज्यावेळी अधिक्रमण काढायला जात असतात त्यावेळी अतिक्रमणधारक पथकाला दमबाजी करतात. म्हणून आता पोलीस व महसूल विभागाने अतिक्रमणे काढून ती जमीनदोस्त करावी. नगरपालिकेने अतिक्रमणे काढण्याच्या प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याची माहित आमदार रघुवंशी यांनी यावेळी दिली,