चाळीसगाव । तालुक्यातील खडकी बुद्रूक चखऊउ तील गुजरात अंबुजा कंपनीतील दुर्गंधीयुक्त उग्र वासावर जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत कंपनीचे प्रोडक्शन बंद करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाण चाळीसगाव यांच्या वतीने आज करण्यात आली.
लहान मुलांना श्वसनाचा त्रास
जिल्हाधिकारी जळगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , चाळीसगाव एमआडीसीतील गुजरात अंबुजा कंपनीतून गेल्या काही महिन्यापासून अंत्यत उग्र स्वरूपाचा घाणेरडा वास येत असुन कंपनी परीसरातील खडकी, हिरापुर, बिलाखेड, कोदगाव, गणेशपुर, पिंप्री सोबतच शहरात देखील मोठ्या प्रमाणावर पसरला आहे. हा वास येवढा जिवघेणा असुन परिसरातील ग्रामस्थांना व लहान मुलांना श्वसनाचे व दमाचे त्रास होत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी तहसीलदार चाळीसगाव कैलास देवरे व कंपनी व्यवस्थापक योगेश काळे यांना परिसरातील नागरिकांसमवेत निवेदन दिले असतांना त्यांनी यावर कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. लोकनेते पप्पुदादा गुंजाळ सामाजिक प्रतिष्ठाणचे राहुल पाटील, सचिन फुलवारी, दिनेश घोरपडे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश चौधरी, जितेंद्र गवळी, प्रशांत चौधरी, रोहित जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दुर्गंधीचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन
कंपनीतील दुर्गंधी बंद करण्याच्या दृष्टीने अंबुजा कंपनीने हालचाली गतिमान केल्या. आज 18 रोजी संभाजी सैनिक आंदोलन करण्याच्या तयारीत असताना तहसीलदार कैलास देवरे यांनी अंबुजा कंपनीचे प्रतिनिधी कंपनी करीत असलेल्या दुर्गंधीच्या बंदोबस्ता बाबतचे पत्र संभाजी सेनेला दाखवून ते पत्र घेऊन आंदोलन थांबवावे, अशी विनंती केली येत्या तीन ते चार महिन्यात दुर्गंधी जवळजवळ बंद होईल, असे तसीलदार देवरे यांनी स्वतः सांगितले अंबुजा कंपनीचे पत्र तहसीलदार यांचे समक्ष संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांनी स्वीकारले यावेळी सुनील पाटील, सुरेंद्र महाजन, अविनाश काकडे, छोटू पाटील, गिरीश पाटील, रविंद्र शिनकर, संदीप जाधव, नीलकंठ साबणे, दिवाकर महाले, भरत नेटारे, भैय्या देशमुख, कैलास देवरे, ईश्वर अहिरे, राहुल अहिरे, इरफान पठाण, नारायण पाटील, बंटी पाटील, भूषण मगर, पप्पू पवार आदी उपस्थित होते.