दुर्दैवी घटना: नंदुरबारमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेल्या ६ मुलांचा बुडून मृत्यू !

0

शहादा: तालुक्यातील वडछील येथील कमरावद तलावात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या ६ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. एका मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या पाच मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याचे बुडून मृत्यू झाला. कैलास चित्रकथे, सचिन चित्रकथे, विशाल चित्रकथे, दीपक चित्रकथे, रवींद्र चित्रकथे, सागर चित्रकथे अशी मृतांची नावे आहेत. आडनावावरून मृत पावलेले मुल हे एकाच कुटुंबातील किंवा समुदायातील असावे असे दिसून येते. या घटनेमुळे वडछील आणि कमरावद परिसरात एकच खळबळ उडाली असून गाव सुन्न झाले आहे.