दुर्दैवी घटना: भिवंडीत इमारत कोसळली; दहा जणांचा मृत्यू

0

ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. आज पहाटे पावणे चारवाजेच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ‘एएनआय’ने याबाबत माहिती दिली आहे. या इमारतीतून काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. २०-२५ जण यात अडकले होते. दरम्यान ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचे आदेश दिलेत.

मुंबईकच्या नजिक असलेल्या भिवंडीत धामनकर नाक्याजवळच्या पटेल कम्पाऊंड भागात ही घटना घडली. ‘जिलानी’ असे या इमारती चे नाव होते. स्थानिक रहिवासी आणि अग्निशमन दलाचे जवानांकडून बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही इमारत ४३ वर्ष जुनी आहे. सदर इमारती मध्ये ४० फ्लॅट्स असून एकूण १५० रहिवाशी वास्तव्यास होते. ही इमारत समावेश धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती अशी माहिती समोर आली आहे.