दुर्बल घटकांसाठी भारतीय सिंधु समाज ठरतोय वरदान

0

जळगाव। भारतीय सिंधु सभेची राष्ट्रीय प्रतिनिधींची दोन दिवसीय सभेचे शिरसोली येथील गांधी तीर्थ येथे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी 8 रोजी संमेलनाचे उद्घाटन झाले. संमलेनाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. राष्ट्रीय प्रतिनिधी सभेसाठी देशभरातून 103 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थीत होते. भारतीय सिंधू सभा हे संस्था उत्तम रित्या कार्य करत असून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचीत घटकातील जनतेसाठी कार्यकरीत असून सभेचे कार्य तळागाळातील जनतेसाठी वरदान ठरत असल्याचे सुर राष्ट्रीय प्रतिनिधींच्या सभेत उमटले. बाळासाहेब चौधरी, भारतीय सिंधु सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष्मणदास चंदिरामानी, भारतीय सिंधु सभचे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष लधाराम नागराणी, भारतीय सिंधु सभेचे महामंत्री राधाकृष्ण भागीया, भगतराम छाबडा, महेश तेजवाणी, घनश्यामदास कुकरेजा, विशाल दरयांणी, निर्मला चावला आदी उपस्थित होते.

गीताचे सादरीकरण
वाशदेव वासवाणी लिखित भारतीय सिंधू सभेचे ’धर्मला जीऊन असी, समाज लाय जीयून असी’ या स्वागत गीताचे सादरीकरण करण्यात आले. चालू वर्षी निधन झालेल्या भारतीय सिंधू सभेचे सदस्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील टिल्डा छात्तीसगड येथील सभेत झालेल्या ठरावाचे यावेळी वाचन करण्यात आले. समाजाचे विकासा करिता करण्यात आलेला कामाचे अहवालाचे वाचन करण्यात आले. बाळासाहेब चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यशस्वीतेसाठी माजी आमदार डॉ.गुरमुख प्रीतमदास रावलानी, एम.पी.उदासी, प्रेम कटारिया, ल्क्ष्मणदास आडवाणी,जितु रावलानी, अजय चुघ्रा, राजेश मलिक, संजय मंधान, अनिल हासवानी, अशोक खटवानी, अशोक रामाणी, हरीश रेसिंघानी, जितु भोजवानी, किशोर बेहरांनी, नरेश कावना, राजा मेहता, विजय कुकरेजा, रेश्मा बेहरांनी, निर्मला उदासी, प्रेम जवाहराणी, दीपा भाटीया आदी सभेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे.