दुष्काळग्रस्त विद्यार्थी सहाय्यता समितीच्या अध्यक्षपदी डॉ . नरेंद्र काळे यांची निवड

0

अंबाजोगाई : औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विद्यापीठाने डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच समितीची स्थापना केली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

मागील दुष्काळात विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवणाची सोय करण्यात आली होती. या योजनेसाठी काही सामाजिक संस्थेचे सहकार्य घेण्यात आले होते. मराठवाड्यात सर्वत्र दुष्काळ असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची मोफत सोय करण्याची मागणीही करण्यात येत आहे .गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार  आहे. दुष्काळग्रस्त विद्यार्थी सहाय्यता समितीच्या अध्यक्ष म्हणून डॉ. नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली. समितीचे सदस्य म्हणून किशोर शितोळे, डॉ . राजेश करपे , प्रा . सुनिल निकम , डॉ . शंकर अंभोरे , डॉ . राहुल म्हस्के यांची निवड करण्यात आली.