दुष्काळसदृश्य परिस्थिती नाही दुष्काळ जाहीर करा-शरद पवार

0

मुंबई- राज्य सरकारकडून राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे. घोषानेनुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. दुष्काळसदृश परिस्थितीशी सामना करण्यासाठी एकूण आठ उपाययोजना राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात दुष्काळी स्थिती असून शासनाने दुष्काळ जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. तसेच दुष्काळी उपाययोजनांची लवकरात लवकर अंबलबजावणी करावी अशी मागणी देखील पवार यांनी केली आहे.