नंदुरबार । वारंवार भेडसावणार्या दुष्काळावर मात करण्यासाठी संघठीत ग्रामशक्तीचाच पर्याय आहे. पाण्यासाठी सुरू असलेल्या श्रमदानातल दहिदुंले ग्रामस्थांचा सहभाग आणि उत्साह प्रशंसनीय असून नंदुरबार जिल्ह्याला दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी करावयाच्या जलसंधारणाच्या कामासाठी नंदुरबार तालुक्यातील दहिदुंले ग्रामस्थांनी श्रमदानाची सुरूवात केली त्यावेळी ते बोलत होते.
गाळाची काढणी आणि खोलीकरण कामाचा शुभारंभ
वॉटरकप स्पर्धेंचा भाग असलेल्या 8 एप्रिल ते 22 मेपर्यंत चालणार्या 45 दिवसांच्या कालावधीतील श्रमदानाच्या कामास सोमवारी जिल्हाधिकार्यांनी श्रमदानाने शुभारंभ झाला. सोबतच नदी, नाला पात्रातील बंधार्यात साठलेल्या गाळाची काढणी आणि खोलीकरण कामाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी नरेंद्र महाले, राजेंद्र दहातोंडे, जयंत अत्तरवार, नरेश कांकरीया, सचित टाक, भाऊसाहेब सोनवणे, विजय कासार, आशिष पटेल, भरत माळी, पाणी फाऊंडेशनचे तांत्रिक मार्गदर्शक सुखदेव भोसले, राहुल गावडे, एकनाथ धानका, ग्रामसेविका स्वाती पाटील, तलाठी खंदारे, दहिदुलेचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. पाणी फाऊंडेशनच्या वॉटररूप स्पर्धेंत सहभागी झालेल्या प्रत्येक गावात नालाखोलीकरण तसेच गाळ काढण्यासाठी भारतीय जैन संघटनेने 100 तासासाठी पोकलँड मशीन किंवा 250 तासांकरीता जेसीबी मशिन उपलब्ध करून देत असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष नरेश कंकरीया यांनी यावेळी केली.