भुसावळ शिवसेनेची प्रांतांसह मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
भुसावळ- शासनाने भुसावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. याचा विचार करुन या मध्यम वर्गीय कामगार, मजुरांची शहर घरपट्टी व पाणी पट्टी माफ करण्यात यावे. यंदा दुष्काळी परिस्थिती असताना पालिकेने मागील काही वर्षांपासून घरपट्टीत प्रचंड वाढ केली आहे. शिवाय घरपट्टी आकारताना देखील मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. त्यामुळे ही वाढीव घरपट्टी कमी करावी असे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर तसेच भुसावळ नगरपरिषद, मुख्याधिकारी यांना शिवसेना शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांच्या नेतृत्वाखाली 26 डिसेंबर 2018 रोजी देण्यात आले.
काय म्हटले आहे निवेदनात?
भुसावळ शहरातील राम मंदिर वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्ड, जाम मोहल्ला, गंगाराम प्लॉट, काझी प्लॉट, बद्री प्लॉट, श्रीराम नगर, मिल्लत नगर, शिवाजी नगर, दिन दयाल नगर, खडका रोड, वरणगाव रोड, जामनेर रोड, विभागातील मध्यम वर्गीय, गरिबी रेषेखालील नागरिक, हातमजूर, बांधकाम व इतर व्यवसायाशी संलग्न असलेला विविध कामगारवर्ग मोठ्या संख्येने राहत आहे. मात्र गेल्या वर्षांपासून नोटबंदी, जीएसटीमुळे लहान-मोठ्या उद्योगधंदे, बांधकाम व्यवसायावर मोठा विपरीत परिणाम झाल्याने कामगार वर्गाच्या हाताला काम नसल्याने उपासमारीच्या संकटाला सामोरा जात आहे. त्यातच वीज दरवाढ, पेट्रोल दरवाढ, महागाई, शासनाचा वाळू उपसा व वाहतूकबंदीचा बडगा कंबरडे मोडत आहे. यामुळे हा सर्व मध्यम वर्गीय कामगार व मजूरवर्ग सैरभैर झाला आहे. संसाराचा गाडा हाकणे सुद्धा कठीण झाले आहे. भुसावळ शहरात दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यातच काम सोडून नागरीकांना पाण्याच्या शोधार्थ फिरावे लागत आहे. नियमित पाणीपट्टी भरून सुद्धा वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांची मानसिक स्थिती खराब होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी भरू नये असे आवाहन आम्ही करणार आहे असे महिला आघाडीच्या शहर संघटिका भुराबाई चव्हाण यांनी सांगितले. यंदा संपूर्ण भुसावळ तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून मागणी करावी, अन्यथा 26 जानेवारी 2019 पासून येथील कामगार, मजूर, मध्यम वर्गीय व गरिबी रेषेखालील नागरिकांच्या वतीने शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांचा नेतृत्वात शिवसेनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, शहर प्रमुख बबलू बर्हाटे, शहर संघटक योगेश बागुल, महिला आघाडी शहर संघटिका भुराबाई चव्हाण, ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख देवेंद्र पाटील, शिक्षकसेना तालुका प्रमुख अतुल शेटे, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोज तडवी, युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील, भारती गोसावी, प्रतिभा दुसाने, रजनी गोसावी, ज्योती मराठे, हिराबाई पाटील, लक्ष्मी खरे, सुनंदा विरघट, उपशहर प्रमुख पवन नाले, धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, सोनी ठाकूर, विकास खडके, युवासेना शहर चिटणीस मयूर जाधव, विक्की चव्हाण उपस्थित होते.