दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल शुल्क सरकार भरणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

0

मुंबई: राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असून दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्कात शासनाने सूट दिली असतांना आता प्रॅक्टिकलचे शुल्काची प्रतिपूर्ती सरकार करेल अशी घोषणा शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शुल्क भरणे सध्या अवघड झाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना सूट देण्यात यावी अशी करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी ही घोषणा केली.