दुष्काळ जाहीर करण्यासह रासायनिक खतांचे भाव कमी करण्यासाठी 10 रोजी आंदोलन

0

रावेर राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे राहणार उपस्थिती

रावेर- यंदा अल्प झालेल्या पर्जन्यमानामुळे रावेर तालुक्याची खालावलेली भूजल पातळी खालावली आहे त्यातच भरमसाठी येणारे पंपांचे वीजबिल, उद्ध्वस्त झालेल्या केळीबागा तसेच बोंडअळीचे अद्यापही प्राप्त न झालेल्या आंदोलनामुळे रावेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा तसेच रासायनिक खतांचे भाव कमी करण्याच्या मागणीसाठी रावेर राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने 10 रोजी आंदोलन छेडले जाणार असून त्यात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांची उपस्थिती राहणार आहे.

तहसीलसमोर होणार आंदोलन
शेतकरी मेटाकुटीस आला असताना राज्य शासनाने मदत तत्काळ देणे गरजेचे असतानाही त्याकडे चालढकल केली जात असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच रावेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी व रासायनिक खतांचे बेसुमार वाढलेले भाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलतर्फे बुधवार, 10 रोजी सकाळी 10.10 वाजता रावेर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी, कष्टकर्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी केले आहे. या धरणे आंदोलनासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड.सचिन आवटे, प्रदेश सरचिटणीस सविता बोरसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्रभैय्या पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे या प्रमुख नेत्यांसह माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश नगराज पाटील व अन्य पदाधिकारी सहभागी होणार आहे.