दुष्काळ निवारण मदत केंद्र सुरू

0

प्रकाश धारिवाल यांचा समाजिक उपक्रम

शिरूर : पाऊस कमी झाल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जनावरे शिरूर येथील पांजरापोळमध्ये सोडवावी. त्यांना चारा पुरविण्याचे काम करणार असून पावसाळ्यानंतर चार्‍याचा प्रश्‍न मिटल्यानंतर आपापली जनवारे घेऊन जाण्याचे आवाहन प्रसिद्ध उद्योगपती व शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी नागरीकांना केले आहे.

स्व. कमलबाई रसिकलालजी धारिवाल यांच्या 7 व्या पुण्यस्मरण निमित्त प्रसिध्द उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, आदित्यकुमार प्रकाशलालजी धारिवाल परिवाराच्यावतीने दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर येथील श्री गोरक्षण पांजरापोळ संस्था येथे दुष्काळ निवारण मदत केंद्र सुरू करण्यात आले. याची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी पांजरापोळ संस्थेचे रमणलाल बोरा, प्रकाश कोठारी, जाकिरखान पठाण, अभिजीत पाचर्णे, मुजफ्फर कुरेशी आदी उपस्थित होते.

जनावरे पांजरापोळ संस्थेत आणून सोडा

दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्यास शिरूर तालुक्यासह इतर तालुक्यातील नागरीकांनी जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न संपेपर्यंत आपली जनावरे पांजरापोळ संस्थेत आणून सोडावी. त्यांना चारापाणी पुरविण्याचे काम करणार असून पावसाळ्यानंतर चार्‍याचा प्रश्‍न संपल्यानंतर आपापली जानावरे पुन्हा घेऊन जाण्याचे आवाहन प्रसिध्द उद्योगपती व सभागृहनेते प्रकाशभाऊ धारिवाल यांनी नागरीकांना केले.