तळोदा। तळोद्यात आज सलग दुसर्या दिवशी अवैध गौण खनिजांची वाहतुक करणारे 5 ट्रॅक्टर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून वाहने ताब्यात घेण्यात आले आहे. तळोद्याचे नवनियुक्त तहसीलदार योगेश चंद्रे यांचा मार्गदर्शनाखाली सलग दुसर्या दिवशी ही कारवाई करण्यात आली असून त्यामुळे अवैध गौण खनिजांची वाहतूक करणार्यांचे धाबे दणादले आहे. तहसीलदार चंद्रे यांनी सलग दुसर्या दिवशी कारवाईचा धडका सुरू ठेवला आहे. चंद्रे यांच्या सलग कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळी 6 वाजता कारवाई
याबाबत सविस्तर असे की, आज सकाळी 6 वाजेचा सुमारास तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी वी. यु. कटारे, पी. एम. भिंगारे, पी. ए. अहिरे, सी. एन. सरगर, वानखेडे व डी. बी. हांडे यांच्या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणार्यांवर कारवाई केली. यामध्ये पथकाने उपजिल्हा रुग्णालय जवळ, चिनोदा फाटा, फॉरेस्ट चेक नाका व कॉलेज चौफुली अशा चार ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये अवैध गौण खनिजांची वाहतुक करणार्या 5 ट्रॅक्टर यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत 5 ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आलेत.
नागरिकांमध्ये समाधान
दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 39 – 4715 मालक बारसिंग वासुदेव पाडवी, ट्रॅक्टर क्रं. जी. जे. 26 – ए 5210, ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 39 – एफ 2756 मालक दीपक वाणी, ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 39 – एन 3897 मालक पंडीत पावरा, ट्रॅक्टर क्रं. एम. एच. 18 – बी 9473 मालक मनोज लोहार आदी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यांमध्ये अंदाजे 1 लक्ष 10 हजार रुपये किंमतीची एकूण 8 ब्रास गौण खनिज आहे. या वाहनांना ताब्यात घेवून तहसील कार्यालयात आणण्यात आले. तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसर्या दिवशी अवैध गौण खनिजांची वाहतूक करणार्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कारवाईत सातत्याची अपेक्षा
तहसीलदार चंद्रे यांनी सलग दुसर्या दिवशी कारवाई केल्याने त्यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तहसीलदार चंद्रे यांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र या कारवाईत सातत्य राहवे असे अपेक्षाही नागरिक व्यक्त करीत आहे. काल देखील 1 लाख 10 हजार रूपयांची 8 ब्रास वाळू वाहनांसह ताब्यात घेण्यात आली होती. तर आजही 1 लाख 10 हजार रूपयांची 8 ब्रास वाळू वाहनांसह ताब्यात घेतले आहे.