दुसर्‍या दिवशीही हतनूर धरणाच्या 10 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

0

भुसावळ- लाभ क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजो सलग दुसर्‍या दिवशीही अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. सोमवारी 14 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडल्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने चार दरवाजे बंद करण्यात आले होते. शनिवार आणि रविवारी हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात 150 मिलीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. यामुळे रविवारी रात्रीपासून धरणातील पाण्याची आवक वाढली होती. हतनूरमधून झालेल्या विसर्गामुळे तापीला पूर आला असून पूर पाहण्यासाठी भुसावळकरांनी तापी पुलावर गर्दी केली होती. मंगळवारी दहा दरवाजांतून 220.00 क्युमेक्स प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाची पातळी 209.30 मीटर तर 176.00 दलघमी साठा शिल्लक आहे. हतनूरच्या उजव्या तट कालव्यातून 11.33 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. हतनूरमधून एकूण 236.33 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.