सेंट लुईस । भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला सिंकफिल्ड बुद्धिबळ स्पर्धेतील दुसर्या फेरीच्या लढतीतही बरोबरी मान्य करावी लागली.
या लढतीत रशीयाच्या पीटर स्विडलरने आनंदला बरोबरीत रोखले. स्पर्धेत पहिल्यांदाच काळ्या सोंगट्यांनी खेळणार्या आनंदने स्विडलरच्या इंग्लिश ओपनिंगला क्विन पॉनपद्धतीने उत्तर दिले होते. आनंदने आक्रमक खेळ करत स्विडलरला अडचणित आणण्याचे प्रयत्न केले. पण, पहिल्या फेरीत पराभूत झालेल्या स्विडलरने सावध खेळ करत आनंदच्या आक्रमक चालींना उत्तर दिले. डावातील 31 व्या चालीनंतर दोघांनी बरोबरी मान्य केली. दुसर्या फोरीतील निकाल पीटर स्विडलर (रशीया, 0.5 गुण) बरोबरी विश्वनाथन आनंद (भारत, 1 गुण). मॅग्नस कार्लसन (नॉर्वे,1.5 गुण) असे आहेत.