दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात; मोठ्या धावसंख्येकडे भारताचे लक्ष

0

राजकोट – वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या पृथ्वी शॉचे शतक आणि चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 4 बाद 364 धावा उभारल्या होत्या. आज सामन्याच्या दुसरा दिवस असून सध्या भारताची स्थिती ४ बाद ३९८ अशी आहे. आज मोठी धावसंख्या उभारून कसोटीवरील पकड भक्कम करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे. विराट कोहली ८८ तर रिषभ पंत ३५ वर खेळत आहे.