दुसाणेतील आरोपी तलवार व चाकूसह गुन्हे शाखेच्या जाळ्यात

धुळे : तलवार व चाकूच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या आरोपीला धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. साक्री तालुक्यातील दुसाणे गावात ही कारवाई गुरुवारी करण्यात आली रामेश्वर लोटन वाघ (दुसाणे, ता.साक्री) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्या ताब्यातून पाचशे रुपये किंमतीचा धारदार चाकू व दोन हजार रुपये किंमतीची तलवार जप्त करण्यात आली.आरोपीविरुध्द निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत प्र.पाटील, सहाय्यक निरीक्षक प्रकाश पाटील, धनंजय मोरे, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोरे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील, सागर शिर्के व कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.