दूध महागले, दरात दोन रुपयांनी वाढ

0

मुंबई – राज्य सरकारने आता सरकारी दूध दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दूध खरेदी करताना लिटरमागे दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहे. नवीन दर 21 एप्रिलपासून लागू होणार आहेत. दूध उत्पादकांना गाईच्या दुधाच्या खरेदीत लिटरमागे 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दूध अर्धा लिटरमागे 22 ऐवजी 24 रुपये होणार आहे.

तर म्हशीच्या दुधाच्या दरातही 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून अर्धा लिटरमागे 31 रुपयांवरून तो 33 रुपये करण्यात आला आहे. शासकीय दूध योजनेमार्फत बृहन्मुंबई दूध योजना आणि ग्रामीण योजनांमार्फत विक्री करण्यात येणार्‍या पिशवीबंद गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरातही दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मुंबईत गाईच्या दुधाला आता लिटरमागे 35 ऐवजी 37 रुपये तर म्हशीच्या दुधासाठी 44 ऐवजी 46 रुपये मोजावे लागणार आहेत. या दूध दरवाढीमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. याआधी खासगी दूध दरवाढ झाली होती.