दूध विक्रते वार्‍यावर दुग्धमंत्री बंगळुरू दौर्‍यावर

0

मुंबई: शेतकरी संपामुळे भाजीपाल्यासह दूध व्यवसायाला चांगलाच फटका सहन करावा लागला. मात्र, शेतकर्‍यांचा संप सुरू झाला त्याच दिवशी म्हणजे 1 जूनला राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे बंगळुरू दौर्‍यावर निघून गेले.

शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने 1 जूनपासून संपाची हाक दिली होती. या संपाचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. दूध व्यवसायाला जबर फटका सहन करावा लागला. दुधाचे टँकर जागोजागी अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतण्यात आल्याचे प्रकार घडले. पण हा सगळं प्रकार सुरू असताना राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे बंगळुरूला गेले आहे. ते 5 जूनला मुंबईत परतणार आहेत. राज्य सरकारचे आरे हे एकमेव ब्रँड आहे उर्वरित ब्रँड हे खासगी आहेत. राज्याच्या दूध उत्पादनात आरेचा अवघा 1 टक्का सहभाग आहे. दूध व्यवसायात सरकारचा अधिक सहभाग नसल्याने कदाचित दुग्धविकास मंत्र्यांनी याकडे कानाडोळा केला असावा, असेही बोलले जात आहे. पण राज्यात दुधाची टंचाई निर्माण झाली असताना दुग्ध मंत्री सूर्यावर जाणे कितपत योग्य आहे असाही सूर आळवला जात आहे. दोन दिवसांपासून सूर असलेल्या संपामुळे पाथर्ली ते लोणावळापर्यंत दुधाचे टँकर हे पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. एका टँकरमध्ये साधारण 10 हजार लीटर दूध असते, असे एकूण 4 टँकर मागवण्यात दुग्ध विभागाला यश आलंय. हे टँकर आरेच्या ब्रँड चे होते. इतर दुग्ध विक्रेत्यांचे टँकर शहरापर्यंत पोहोचण्यास अडचण झाल्यास त्यासाठी दुग्धविकास विभागाने तक्रार कक्ष उघडला असून, संबंधित त्यावर तक्रार केल्यास त्यांच्याही अडचणी दूर करता येणार आहे.

यासंदर्भात दुग्ध मंत्री महादेव जानकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, शासकीय कामासाठी बंगळुरूला गेल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, शासकीय कार्यक्रम काय, याबाबत कार्यालयाकडून कोणतीच माहिती नव्हती.