दूरदर्शनचे माजी निर्माते सुधीर पाटणकर यांचे निधन

0

मुंबई : आज सकाळी मुंबईत, दूरदर्शनचे माजी निर्माते सुधीर पाटणकर यांचे अल्पशा आजाराने निधन जाले. साप्ताहिकी, युवादर्शन, आमची पंचविशी, बातम्या अशा अनेक कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली.

मराठी रंगभूमीवर त्यांचा विशेष अभ्यास होता. प्रतिभा आणि प्रतिमा या लोकप्रिय मालिकेच्या काही भागांचीही निर्मिती पाटणकरने केली होती. शिस्तप्रिय निर्माते म्हणून ते सहकाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते. सुधीर पाटणकर ३५ वर्षे दूरदर्शनच्या सेवेत होते.