अमळनेर । तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलमध्ये प्रसिद्ध गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजम यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते. व्यासपीठावर शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के, स.के.महाजन, एच.ओ.माळी, आय.आर.महाजन, एन जी.देशमुख होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक आय.आर.महाजन यांनी केले.
गणित विषय सोपा – महाजन
थोर गणिततंज्ञ श्रीनिवास रामानुजम यांनी लावलेली शोध व गणितातील संकल्पना याबाबत माहिती शाळेचे गणित शिक्षक एस.के.महाजन यांनी सांगितले. तर अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी जीवनात यशस्वी व्हावयाचे असेल तर गणित आले पाहिजे. गणितावरुण विद्यार्थीची प्रगती कळते. गणित विषय सोपा आहे. तो ज्याला समजला तो जीवनात यशस्वी झाला. म्हणून गणीत विषयाकडे लक्ष दयावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आय.आर.महाजन यांनी केले तर आभार प्रर्दशन एच.ओ.माळी यांनी केले. यावेळेस विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी तयार करण्यासाठी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.