देवरे माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

0

धुळे । तालुक्यातील रावेर येथील कै.भा.सु.देवरे. माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन, क्रिडा दिन आणि संस्थेचे सचिव कै.राजेश देवरे यांची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी शालेय अध्यापनाचे कामकाज पाहिले व शिक्षकांची भुमिका बजावली. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती, मेजर ध्यानचंद जयंती निमित्त राष्ट्रीयक्रिडा दिन आणि रावेर एज्युकेशन सोसायटीचे सचिव कै.राजेश देवरे यांची पुण्यतिथी आदी सामुहिक कार्यक्रमाचे नियोजन करुन विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निबांजी देवरे होते. यावेळी उपसरपंच भुषण देवरे, के.एम देवरे, एस.डी.पाटील ,वाय.पी.सुर्यवंशी, सी.ए.पाटील, व्ही.एन.पाटील, व्ही.आर.पाटील, वाय.एस.पाटील, एम.एन.महाले, पी.एम.वाघ, एस.आर.देवरे, जे.व्ही.पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस.वाय.पाटील यांनी तर आभार एच.एस. शिरसाठ यांनी केले.

नंदाने झेडपी शाळा
जिल्हा परिषद शाळा नंदाने येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. धावण्याची, गोणपाट, लिंबू, चमचा, वजनाएवढे वजन उचलने, संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आले. प्रत्येकी दोन विजेत्यांना पेन देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेशआहिरे होते. प्रमुखपाहुणे म्हणून स्वयंशासन दिनाचे विद्यार्थी मुख्याध्यापक दीपक भिल होते.