देवळीच्या ग्रामसभेत दांगडो 

0

* सत्ताधाऱ्यांवर ग्रामसभेत मनमानी कारभाराचा आरोप
* समस्या मांडणाऱ्या  महिलेला अपमानास्पद  वागणुकीने गोंधळ 
चाळीसगाव – येथील देवळी ग्रामपंचायतिची ग्रामसभा काल २७ रोजी गावातिल ग्रामपंचायत आवारात घेण्यात आली  होती. सभेच्या पटलावरील सर्व विषय संपले होते. आयत्यावेळीच्या विषयात गावातील पंतप्रधान घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे बिटाबाई पांगारे पाटील यांनी सवाल उपस्थित केला होता त्यावर ग्रामसेवकएस के तेली हे उत्तर देत होते मात्र मधेच उपसरपंच अतुल पाटील हे बोलायला लागले यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला त्यात उपसरपंच व गावकरी  महिला यांनी एकमेकांना अपशब्द वापरल्याने ग्रामसभेत दांगडो झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे .

ग्रामसभेत भ्रष्टाचार मुद्द्यांवर अरेरावी
ग्रामसभेत ग्रामस्थानी अनेक विचारले प्रश्नांची सरबत्ती केली होती मात्र उत्तरे देण्याचे कर्तव्य शासनाचा जबाबदार व्यक्ती म्हणून ग्रामसेवक यांचे असते असे असतांना सरपंच, उपसरपंच, यांनी कोणत्याही प्रकारे उत्तरे दिली नाहीत  आणि जमलेल्या गावकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तरे न देता ग्रामसभा उधळून लावली. व संबंधित महिलेला अरेरावीची भाषा केली तसेच बंदिस्त ग्रामपंचायत कार्यालयात तीन सदस्यांना वगळता ग्रामसभेचे कामकाज पूर्ण केले. ही मनमानी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक योग्य आहे का असा संभ्रम गावातील ग्रामस्थामध्ये निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या मुजोर कारभाराला लगाम लागेल का असा प्रश्न निर्माण झाला असल्याची चर्चा देवळी गावात घेण्यात दिसून  आलेली आहे त्यामुळे  ही ग्रामसभा  पुन्हा घ्यावी असे गावकऱ्यांचे म्हणणे यावेळी ग्रामसेवक यांच्याकडे मांडली आहे.त्याबाबत तालुक्याच्या गटविकास कार्यलयाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे

या विषयांवरून झाला दांगडो
ग्रामसभेत महिलासहसुमारे दोनशे गावकरी उपस्थित होते संबंधित ग्रामसेवक यांना देवळी गावात झालेल्या भ्रष्टाचारा बाबत विचारणा केली यात गावातील शौचालय निकृष्ट दर्जाची बांधली, तसेच  घरकुल कोणत्या निकषावर देतात,  त्याचप्रमाणे१४ व्या वित्त आयोगातील निधी खर्च न करता सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगण मताने निधी हडपला असल्याचा यावेळी आरोप ग्रामस्थांनी केला हा देवळी गावातील जनतेवर अन्याय होत आहे शासन व अधिकारी याची चौकशी करून संबंधित दोषींना   निलंबित करण्यात यावे असे मत गावातील ग्रामस्थानी वरिष्ठ अधिकारी यांचेकडे  व्यक्त केली असून  सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा नवीन घ्यावी, अन्यथा सदस्य व गावातील ग्रामस्त पंचायत समिती समोर उपोषणास बसणार असल्याचे पत्र गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे दिले असून त्यांनीही सर्व पातळीवरून माहिती घेतो असे जनशक्ती शी बोलताना सांगितले आहे.

कोट-
देवळी ग्रामपंचायती मध्ये २०११ पासून ग्रामसेवक म्हणून काम पाहतो आहे उपसरपंच अतुल पाटील व गावकरी महिला बिटाबाई पांगारे पाटील यांच्यात वाद झाला त्यामुळे गदारोळ झाला इतरांनीमध्यस्थी करीत वाद मिटविला  गावकऱ्यांनी केलेली मागणी गदारोळात ऐकायला येत नव्हती त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल.
– ग्रामसेवक एस. के. तेली