देवाची उपासना केल्यास सुख शांती मिळते

0

जळगाव : देवी भागवतमध्ये म्हटले आहे की, चार नवरात्री असतात. त्यात दोन गुप्त असतात, आता गुप्त नवरात्री सुरु आहे. चैत्र, अश्‍विन आणि माघ महिन्यात कथेचे श्रवण करायला हवे. कथेच्या श्रवणाने पुण्य मिळत असते. सुर्यास्तानंतर घराच्या बाहेर जो भक्त दिवा प्रज्वलित करतो, तेथे आदिशक्तीचा वास असतो आणि वावर असतो. तसेच आणि जेथे अंधकार असतो, तेथे धर्म येत नाही. त्यामुळे घराला प्रकाशमान बनवा, असे सांगून प्रत्येक जीव अध्यात्म घेवून जन्माला येत असतो. े, असे कथासम्राज्ञी साध्वी देवकन्या सुगनाबाईसा यांनी कथेत निरुपणाद्वारे मांडला.

अखंड ज्योत पेटविण्याचे सांगितले महत्व
सागर पार्क येथे देवी भागवत कथा सुरु आहे. आज कथेचा दुसरा दिवस होता. कथेच्या सुरुवातीला भगवान गणेश महाराजांचे गुणगाण गायिले गेले. या भजनप्रसंगी अनेक भक्त तल्लीन होऊन नाचू लागले. कथाकार कथासम्राज्ञी देवकन्या सुगणाबाईसा दिदी निरुपणप्रसंगी म्हणाल्या, आपल्या मनात जर चांगला आणि शुद्धभाव असला तर निश्‍चितच भगवान प्रसन्न होत असतो. नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंड ज्योत का पेटविली जाते? याबद्दल दिदी म्हणाल्या, ज्योत पेटवल्यानंतर त्या भक्तावर कधीच शनीची छाया पडणार नाही. पित्रांच्या आत्म्यांना संतुष्टी मिळत असते, असे त्यांनी सांगितले.

सहकार राज्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती
काल दैनिक यजमान नितीन पाटील आणि शामजी झवर हे होते, तर प्रसाद यजमान म्हणून चंदन अबोटी आणि घनश्यामदास मित्तल हे होते. महोत्सवात आ. भोळे यांनी ठिकठिकाणी ‘वंशाला दिवा हवा, पणती का नको? बेटी-बचाव, बेटी-पढाओअसे जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत. सायंकाळी राज्याचे सहकार राज्यमंत्री तसेच परभणी जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आणि इतर मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न झाली.