पुणे : भारतीय संस्कृतीचे अभ्यासक देवदत्त अनगळ यांच्या संग्रहातील देशविदेशातील गणेश मुर्तींचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात भरविण्यात आले आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच झाले. रविवारी सकाळी 10 ते सायकांळी 7 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
या प्रदर्शनात भारतीय उपखंडातील कंबोडिया, नेपाळ, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, थायलंड, ब्रम्हदेश या देशांतील वैशिष्ट्यपूर्ण गणेश मुर्ती पाहायला मिळणार आहेत. आठव्या शतकापासून आजपर्यंतच्या मुर्त्यांचा यात समावेश आहे. सोने, चांदी, तांबे, पितळ, जस्त, हस्तिदंत, प्राचीन दगड व मातीपासून बनविलेल्या या मुर्तींचा आकार दोन सेंटीमीटरपासून 2 फूटांपर्यंत आहे. त्रिशुंड गणेश, पंचमुखी गणेश, दोन हातांपासून बारा हात असणारे गणेश, वामन अवतारातील गणेश, लहान मुलांच्या स्वरूपात विविध लीला करणारे गणेश, वाद्ये वाजविणारे, विविध पेहरावातील गणेश पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. 400 मुर्ती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.