मुंबई – करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ट्विटवरुन महाराष्ट्राच्या जनतेला मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणार्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!, असे ट्विट मोदींनी केले आहे.
महाराष्ट्र दिनाबरोबर मोदींनी गुजरातमधील नागरिकांनाही गुजरात स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुजराती लोकांनी नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले योगदान दिले आहे, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र !
— Narendra Modi (@narendramodi) May 1, 2020