देशातील करोनाग्रस्तांची संख्या १ लाखाच्या पुढे

0

नवी दिल्ली – देशातील करोनाबाधित रुग्णाने लाखाची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातील करोनाग्रस्तांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४९७० नवीन करोनाग्रस्त आढळले तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ३६,८२४ रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण ३८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत २७१५ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्या ३१६३ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि दिल्ली या चार राज्यांत करोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत. देशातील मोठ्या शहराची परिस्थिती चिंताजनक असून एकूण करोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रूग्ण मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील आहेत. या पाच शहरातील करोनाग्रस्तांची संख्या जवळपास ५०हजार आहे.

राज्यात २,०३३ नवे रुग्ण

राज्यात सोमवारी करोनाचे आणखी २,०३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ३५,०५८ वर पोहोचली. राज्यात सोमवारी ५१ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १,२४९ वर पोहोचली. राज्यभरात आतापर्यंत ८,४३७ रुग्ण बरे झाले आहेत.