नवी दिल्ली – लॉकडाऊनच्या काळात लागू केलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजार असलेली रुग्णांची संख्या त्यानंतर काही दिवसांतच ९० हजारांच्या वर जाऊन पोहोचली आहे. ही संख्या चीनमधील रुग्णसंख्येपेक्षा जास्त आहे.
देशातील मोठ्या शहराची परिस्थिती ही चिंताजनक असून एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी आहेत. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, चेन्नई आणि पुणे या पाच शहरातील स्थिती ही गंभीर आहे. या पाच शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास ४६ हजार आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास २,८०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.