CORONA UPDATE: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ

0

नवी दिल्ली: जगभरात करोनाने अक्षरश: कहर माजविला आहे. देशात दररोज ६० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. धक्कादायक म्हणजे आजपर्यंतची विक्रमी नोंद गेल्या २४ तासात झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ६९ हजार ६५२ नव्या करोनाबाधित आढळले आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली आहे. चोवीस तासांत ९७७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

समाधानकारकबाब म्हणजे आतापर्यंत २० लाख ९६ हजार ६६५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या देशात असून ६ लाख ८६ हजार ३९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ५३ हजार ८६६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ९ लाख १८ हजार ४७० करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ६१ हजार २५२ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.