‘अपना वतन’तर्फे शहीद सैनिकांना श्रद्धांजली
चिंचवड : सन मे 2014 मध्ये सत्ता परिवर्तन झाले. त्यांनतर पाकिस्तानविरोधात सत्ताधारी पक्षकाडून कणखर भूमिका घेतली जाईल अशी अपेक्षा होत. 2014 पासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सन 2017 मध्ये पाकिस्तान सैन्यांने 860 वेळा व सन 2018 मध्ये आजपर्यंत 4 महिन्यांमध्ये 633 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यावेळी सीमारेषेवर वारंवार गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिउत्तर देताना अनेक भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. सन 2016 मध्ये 64 जवान, सन 2017 मध्ये 45, सन 2018 पासून 4 महिन्यांमध्ये 28 जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे आपल्या देशातील जवानांची मरण एवढे स्वस्त झाले आहे का असा प्रश्न अपना वतन संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी उपस्थित केला. अपना वतन संघटनेच्यावतीने जम्मू-काश्मीर येथील सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबारामुळे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी शेख बोलत होते. उपस्थितांनी मेणबत्या पेटवून व मौन धारण करून भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पित केली.
केंद्र सरकारला नागरिकांकडून पत्र
भारत सरकारने पाकिस्तान विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवायला हवा. संयुक्त राष्ट्र संघामध्ये पाकिस्तानबाबत कठोर धोरणे तयार करून त्यांची अंमलबजावणी तात्काळ करायला हवी. अशा मागणीचे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक केंद्र सरकारला एक लाख पत्रे पाठवणार आहेत. कार्यक्रमासाठी संघटनेचे संपर्कप्रमुख हरिशचंद्र तोडकर, प्रवक्त्या सॅन्ड्रा डिसोझा, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, माजी नगरसेविका उषा चरोडिया, चिंचवड विभागप्रमुख फारुख शेख, फ्रान्सिस गजभिये, दीपक खैरनार, प्रशांत सपकाळ, संदीप पिसाळ, बी. आर. ग्रुपचे सतीश कदम, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, वैभव गजधने, लोकशाही संस्थेचे अजय लोंढे, भारत मिरपगारे, सोमनाथ उमाप, अब्दुल शेख, हाजीमलंग शेख, विठ्ठल कांबळे, विशाल बोत्रे, तबरेज पठाण, सलीम शेख आदी उपस्थित होते.