अंबाजोगाईत 7 एप्रिल रोजी होणार्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन
अंबाजोगाई : देशात बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरणाचे सरकार उलथून टाका, बहुजन वंचितांचे सरकार आणण्याची गरज आहे. कैकाडी समाज, वंचित घटकातील एक साधनांची कमतरता असून जात आणि पैसा हे निवळ फसवणुकीचे समीकरण आहे. जिल्ह्यातील तीन हजार पांचशे लोकसंख्या असलेल्या 126 गावात प्रचार बैठका झाल्या असून आमची फौज मोठया ताकतीने प्रचार करत आहे. या वेळेसची निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. जिल्ह्यात लोकांना परिवर्तन हवं आहे. प्रकाश आंबेडकर व बॅ. ओवेशी यांच स्वप्न साकार करण्यासाठी आमची टीम कामाला लागली असून समोरचे लोक एकमेकांना जरी भांडताना दिसत असले तरी आतून एक असल्याचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार विष्णू जाधव पत्रकार परिषदेत सांगितले.
अंबाजोगाई शहरातील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार प्रा. विष्णु जाधव, प्रा बळीराम सोनवणे, देविदास बचोटे, प्रा. बबन वडमारे, सय्यद रज्याक, प्रा. रमीज, सुशांत धावरे, प्रमोद सिताप यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. विष्णू जाधव म्हणाले की, ऊसतोड कामगारांचा बीड जिल्हा अशी असलेली ओळख मला पुसून टाकायची आहे. देशाची राज्यघटना वाचवणार्याला सत्तेवर येणे आवश्यक असल्याने सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहायचे आहे. इतक्या वर्षांनी सत्तेत असणार्यांना जलसिंचन सुविधा, वैद्यकीय सुविधा, पंचतारांकित एमआयडीसी, अंबाजोगाई जिल्हा, रेल्वे प्रश्न सोडवता आले नाहीत, ते फक्त मत मागण्यासाठी विकासाचे राजकारण करत आहेत. सातत्याने जनतेचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे ही सत्ताधार्यांची नीती असून 2019 ला सत्तेचे परिवर्तन होणार आहे. गरीब मावळ्यांची टीम घेऊन मतदारसंघात फिरतो आहे. बीड जिल्ह्याचे लोक परिवर्तनशील असल्याने बहुजन वंचित आघाडीला मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी बाळासाहेब आंबेडकर हे सात एप्रिल रोजी बीड जिल्ह्यात येत असून माजलगाव व अंबाजोगाई येथे त्यांची जाहीर सभा होणार आहेत. वंचित घटकातील सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन भारिपचे पुर्व बीड जिल्हा अध्यक्ष बळीराम सोनवणे एमआयएमचे प्रा. रमीज यांनी संयुक्त केले आहे.