नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन 5.0 लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 1 जून ते 30 जून दरम्यान लागू होणार आहे. मात्र या दरम्यान धार्मिक स्थळे काही अटींसह उघडली जाणार आहेत. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल. सरकारने याबाबत मार्गदर्शकतत्वे जारी केले आहेत. लॉकडाऊन -5 ला अनलॉक -1 असे नाव देण्यात आले आहे.
मुख्य गोष्टी –
लॉकडाऊन -5 ला अनलॉक -1 असे नाव देण्यात आले आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंट 8 जूनपासून सुरू होतील.
30 जूनपर्यंत रात्री कर्फ्यू सुरु राहणार.
8 जूनपासून अटींसह धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी.
सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध कायम राहतील
8 जूनपासून शॉपिंग मॉल्स सुरू होतील.
जुलैमध्ये सिनेमागृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय जुलैमध्ये घेण्यात येईल.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची बंदी कायम राहील.
पान, गुटखा आणि दारू पिण्यास सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध कायम.
कंटेनमेंट झोनमध्ये केवळ आवश्यक सेवांना परवानगी असेल.