नवी दिल्ली: देशभरात उन्हाच्या तीव्रतेत मोठी वाढ झाली आहे. अनेक शहरांचा पारा हा ४४ पार गेला आहे. दरम्यान, उत्तर भारतात उष्णतेची लाट आली असून राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरयाणा आणि चंदीगड या राज्यांना २५ आणि २६ मे रोजी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या काळात दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला हवामान विभागाकडून नागरिकांना देण्यात आला आहे.
या उष्णतेच्या लाटेचा येत्या पाच दिवसांत सर्वाधिक फटका पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगाणा या भागांना बसणार आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत ओडीशा, छत्तीसगड, गुजरात, मध्य मध्य प्रदेश, मराठवाडा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटकच्या उत्तर भारतात उष्णेतेची लाट लावण्यात येणार आहे.”
उष्णतेची लाट ही त्यावेळी मानली जाते जेव्हा संबंधित शहरांमध्ये हवामान खात्याच्या केंद्रांवर किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा तापमान नोंदवलेले असेल. तसेच पठारी भागात ३७ डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त, तर किनारी भागात कमीत कमी ३० डिग्री आणि त्यापेक्षा जास्त तापमान हे डोंगराळ भागात नोंदवले गेले पाहिजे.