नवी दिल्ली: जगाबरोबरच भारतातही कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. दररोज ५० हजाराने वाढणारे रुग्ण आता ६० हजाराने वाढत आहेत. मात्र मागील २४ तासात कोरोनाने आतापर्यंतचे सर्व रेकोर्ड मोडले आहे. मागील २४ तासात देशात ६४ हजार ३९९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने २१ लाखांचा टप्पा ओलाडंला आहे. आता देशात २१ लाख ५३ हजार ०११ रुग्णांची नोंद झाली आहे.
दुसरीकडे रिकव्हरी रेट देखील चांगला असल्याने आतापर्यंत तब्बल १४ लाख ८० हजार ८८५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. भारतातील रिकव्हरी रेट ६८.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या स्थितीत जवळपास ३० टक्के रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशात सध्या ६ लाख २८ हजार ७४७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. दुर्दैवाने आतापर्यंत ४३ हजार ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगात रुग्णांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा आहे. अमेरिकेत करोना रुग्णांची संख्या ५० लाखांपेक्षा जास्त, ब्राझिलमध्ये २८ लाखांपेक्षा जास्त तर भारतात २० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. रशियात ८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. तर दक्षिण अफ्रिकेतल्या रुग्णांची संख्या ५ लाखांच्या पुढे आहे. मेक्सिकोमध्ये ४ लाखांच्या पुढे रुग्णसंख्या आहे. पेरुमध्येही चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण संख्या आहे. जगातल्या २०० पेक्षा जास्त देशांमध्ये करोनाचा प्रसार झाला आहे.