नवी दिल्ली । देशात तंबाखूचे सेवन करणार्यांचे प्रमाण घटले असून, तब्बल 81 लाख लोकांनी तंबाखू सेवन करण्याचे सोडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी तंबाकूचे सेवन सोडावे ही नक्कीच आनंदाची बाब आहे. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आले असून, आरोग्याच्या बाबतीत लोक सजग झाले आहेत, असेही नड्डा म्हणाले.
तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या कामाचा गौरव म्हणून त्यांनी जागतिक आयोग्य संघटनेने विशेष पुरस्काराने नड्डा यांना विशेष पुरस्कारने सन्मानीत केले यावेळी नड्डा बोलत होते. यावेळी बोलताना नड्डा म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 नुसार तंबाखूचा वापर 2020 पर्यंत 15 टक्क्यांनी आणि आणि 2030 पर्यंत 30 टक्क्यांनी कमी करण्याचे ध्येय ठेवले आहे. तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंबाखू मुक्त समाज करणे हाच आमचा प्रयत्न राहणार आहे, असे सांगतानाच तंबाखू हे देशातील गरीबी वाढवणारे आहे, त्यामुळे तंबाखूचा वापर करणार्यां त्याचे सेवन करू नका असे आवाहन करा, असेही नड्डा या वेळी म्हणाले. तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात. भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कँसर (कर्करोग) असलेल्या रूग्णांची संख्या सर्वांत मोठी आहे. भारतात, 56.4 % स्त्रियांना आणि 44.9 % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. 90% पेक्षा जास्त फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कँसर होण्याचे कारण धूम्रपान आहे.
तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्यांचे विकार, ह्दयरोग, छातीत दुखणे, हदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक (मेंदूचा विकार), परिधीय संवहनी रोग (पायाचा गैंग्रीन) हे रोग होतात. भारतात 82 % फुफ्फुसाच्या दीर्घकालीन रोगांचे कारण धूम्रपान हे आहे. तंबाखू हे क्षयरोग होण्याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणा-यांमध्ये देखील टीबी, 3 पट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बीड़ीचे धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते. धूम्रपान, तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते. ह्यामुळे पायाकडे होणा-या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गैंग्रीन होऊ शकते. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्यांच्या पापुद्र्याला नुकसान पोहचवते.