मुंबई । क्रिकेट जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याची इच्छा सुरूवातीपासून होती. त्यामुळे सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्यासाठी क्रिकेटमधील कसोटी, वन- डे, व्टिट- 20 या तीनही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करायला हवी याचे सुरूवातीपासून लक्ष्य होते.हे लक्ष्य गाठण्यासाठी तिन्ही प्रकारच्या खेळात सातत्यपूर्ण कामगिरी कारावी लागणार हे कुठेतरी ठरविले होते. त्यानुसार क्रिकेटच्या तीनही प्रकारात स्वत:मध्ये बदल करणे व देशाला अग्रस्थानी नेणे हेच लक्ष्य नेहमी डोळ्यासमोर असते असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयतर्फे देण्यात येणा़र्या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीच्या प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्काराने कोहलीला गौरविण्यात आले, त्यावेळी म्हणाला.
120 टक्के मेहनत
यावेळी बोलतांना कर्णधार विराट कोहलनी टीकाराना लक्ष्य करित म्हणाला की,माझ्या टीका करणारे आहेत, त्या टीकाकांरापेक्षा ही मी माझ्या क्षमतेवर पुर्ण विश्वास ठेवतो,आतापर्यंत करिअरवर टीका करणार्यांनी माझ्यावर शंका उपस्थित करणारे अनेक आहेत.त्यांच्याकडे लक्ष न देता स्वत:वर विश्वास ठेवतो. मी 120 टक्के मेहनत क्रिकेटसाठी घेत आहे तर मला कोणालाही उत्तर देणे महत्वाचे वाटत नाही असे कोहली म्हणाला. संघातील खेळाडूंकडून मिळणा़र्या पाठिंब्याचेही कोहलीने यावेळी तोंडभरून कौतुक केले. गेल्या वर्षभरातील काळ माझ्यासाठी उल्लेखनीय राहिला.
प्रत्येक खेळाडूचे योगदान
एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला दरवर्षी काहीतरी नवी संधी मिळण्याची इच्छा असते. दररोजची मेहनत, सराव शिबीर आणि त्यागाचे फळ मिळाले. पण संघातील प्रत्येक खेळाडूचा योगदानाशिवाय हे शक्य झाले नसते, असे कोहली म्हणाला. यंदाच्या हंगामात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 अशा तिन्ही प्रकारांत सर्वाधिक धावांचा मानही कोहलीच्या नावावर आहे. त्याने तिसर्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले. अष्टपैलू खेळाच्या बळावर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणार्या रविचंद्रन अश्विनला दिलीप सरदेसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार दुसर्यांदा पटकावणारा अश्विन पहिला खेळाडू ठरला. स्थानिक क्रिकेटमध्ये जेतेपदांवर वर्चस्व राखणार्या मुंबई क्रिकेट असोसिएशनलाही गौरवण्यात आले.