देश आयसीयूमध्ये; पाकसोबत चर्चा नको, युद्ध हवे!

0

प्रवीण तोगडीया यांचे औरंगाबादेत वक्तव्य

औरंगाबाद : देशाचे आरोग्य आयसीयूमध्ये आहे. एकीकडे देशातला शेतकरी आत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे भारताचा सैनिक पाकिस्तानच्या गोळ्या खाऊन शहीद होत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानसोबत चर्चा नको युद्ध हवे, असे सांगत पाकिस्तानवर हल्ला करा, अशी भूमिका विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री डॉ. प्रवीण तोगडीया यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये मांडली.

राम मंदीर उभारूनच निवडणुकीत उतरा
पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडीया म्हणाले, एकीकडे शेतकरी कर्ज घेवून मरत आहेत. तर सीमेवर 90 टक्के जवाना शेतकर्‍यांची मुले आहेत. ती पाकिस्तानच्या दहशतद्यांच्या गोळ्या खाऊन शहीद होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर टँक मिसाइलने हल्ला करत युद्ध करण्याची गरज आहे. जनतेने राममंदिराच्या उभारणीसाठी तुम्हाला मतदान केले आहे. न्यायालयाच्या निवाड्यानुसार मंदिराला कमी तर मशिदीला जास्त जागा मिळणार आहे. परंतु, मंदिराच्या बाजूला आम्ही मशीद होऊ देणार नाही. जीएसटीसाठी मोदी सरकार रात्रीची संसद बोलावते, मग राम मंदिरासाठी का नको, असा सवाल तोगडिया यांनी केला. संसदेत कायदा करूनच राम मंदिराची उभारणी करीत या सरकारने 2019 मध्ये पुन्हा थेट दिल्लीत विराजमान व्हावे, असा सल्लाही तोगडिया यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला.