देहूच्या सरपंच पदी बहुमतांनी उषा चव्हाण

0

देहूरोड : देहू ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूक प्रक्रीयेत उषा चंद्रकांत चव्हाण यांना बहूमत मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी त्यांना विजयी घोषीत केले.त्यांच्या चाहत्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत,भंडाराच्या उधळणीत ,ड़ीजेच्या तालावर नाचत आनंद व्यक्त केला. देहू ग्रामपंचायतीचे सरपंच सुनिता टिळेकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रीया पार पडली.सकाळी बारा वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या वेळेत चौघांनी नामनिर्देशन पत्र घेतले.मात्र सरपंच पदासाठी करंडे यांचा ,सूचक स्वप्नील काळोखे आणि उषा चव्हाण यांचे दिपाली जंम्बुकर यांचा असे दोन नामनिर्देशन पत्र सादर झाला.साडेबारा पर्यत नामनिर्देशन पत्र छाणणी,एक वाजे पर्यंत नामनिर्देशन पत्र माघार घेणे .त्यानंतर निवड प्रक्रीया पार पडले.

अध्यासी निवडणूक अधिकारी, मंडलाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी अर्जून गुडसुरकर यांनी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या ज्योती साळुंखे हे अनुपस्थीत असल्याने १५ सभासदांच्या उपस्थीतीत निवडणूक प्रक्रीया प्रांरभ केली. दोन नामनिर्देशन पत्र असल्याने गुप्त मतदान प्रक्रीयेत मतदान घेण्यात आले. करंडे यांना तीन आणि चव्हाण यांना बारा मते मिळाली. मतदाराच्या निवडणूकीत चव्हाण यांना बहूमत मिळाल्याने चव्हाण यांना विजयी घोषीत करण्यात आले.