देहूरोड येथे महावीर जयंती उत्साहात साजरी

0

देहूरोड : देहूरोड येथे जैन बांधवांच्यावतीने भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. महावीर स्वामींची मिरवणूक हे या जयंती सोहळ्याचे आकर्षण ठरले. जैन धर्मीय महिला पुरूष मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. जैनधर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जैन संघातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहाटे भगवानजींची पूजा करणार्‍या तरुणांचा विशेष सतनमान हा प्रमुख कार्यक्रम होता.

भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक
सकाळी जैन स्थानक येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 ते 4 या वेळेत सोमाटणे फाटा येथील कलश मंदिरात स्वामींचे प्रवचन झाले. सायंकाळी महावीर स्वामी मंदिरात कल्याणक पूजा करण्यात आली. सायंकाळी पाचच्या सुमारास बाजारपेठेतून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युवकांनी महावीर स्वामींच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या. बँडच्या साथीने बाजारपेठेतून बँक ऑफ इंडिया चौक मागाने ही मिरवणूक संपन्न झाली. आमदार संजय (बाळा) भेगडे यांनी या मिरवणुकीला भेट देऊन स्वागत केले. जैन संघाचे अध्यक्ष मदन सोनिगरा, उमेश जैन, राजू गुंदेशा, निरज गुंदेशा, अनिल सोळंकी, सुरेश सोळंकी, महेंद्र कुमावत, राजू ओसवाल, अरविंद कटारिया, हरीश सोळंकी यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात पुढाकार घेतला होता. सायंकाळी महिलांसाठी धार्मिक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन धर्मिय शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.