दोंडाईचातील बालिकेवर अत्याचार, नराधम आरोपी अखेर जाळ्यात

0

विशेष तपास पथकाची कारवाई ; 24 दिवसांनी गवसला आरोपी

धुळे : दोंडाईचा शहरातील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्यानंतर पसार झालेल्या रेवनाथ रामसिंग भगत (भील) (35, रा़ म्हाळसानगर, दोंडाईचा) या नराधम आरोपीच्या विशेष तपास पथकाने रविवारी मुसक्या आवळल्या. तब्बल 24 दिवसांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. धुळ्याचे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परीषद घेऊन त्याबाबत माहिती दिली.

8 फेब्रुवारी रोजी दोंडाईचा येथे अल्पवयीन बालिकेवर चॉकलेटच्या आमिषाने अत्याचार करण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासाधिकारी संदीप गावीत, दोंडाईचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़.