दोंडाईचा येथे किसान संघर्ष यात्रेचे बैलगाडी पुजनाने स्वागत

0

शिंदखेडा। शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, ‘राजू शेट्टी आगे बढो’ च्या गजरात खा.राजू शेट्टींचे स्वागत झाले. योगेंद्र यादव, प.स सदस्य शानाभाऊ सोनवणे यांनी शेतकरी मच्छिंद्र नवल कोळी, हिराबाई मच्छिंद्र कोळी यांच्या बैलगाडीची पुजा केली. यावेळी आच्छी, झोटवाडे, शेदवाडे,साऊर,मालपुर,विखरण,टाकरखेडा, जुने कोरदे, बाम्हणे,रामी,तावखेडा,मंदाणे,शेवाळेसह साऊर येथील शेतकरी महेश ईशी,नरेंद्र राजपूत, रविंद्र सदाराव,जवानसिंग गिरासे, राजेंद्र खैरनार, मोहन पाटील, मंगलसिंग गिरासे, बापू पाटील, शिवदास कोळी, छोटू साळुंखे, अमर कोळी, भुषण पवार, निलेश कोळी, रामसिंग राजपूत, गोकुळ कोळी, शिवदास ईशी, आकाश कोळी आदी उपस्थित होते.

बहुसंख्य शेतकरी हे आदिवासी कुटूंबातील
शिंदखेडा तालुक्यात 160 शेतकरींचे धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेक बाऊन्सच्या 138 कामाच्या केसेस केलेल्या आहेत. त्यापैकी अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. आच्छी गावात बहुसंख्य शेतकरी हे आदिवासी कुटूंबातील आहेत. जे.डी. डी. सी. बँकेचे 10 वर्षापुर्वीचे घेतलेले कर्ज फेडू शकले नाहीत.म्हणून कोर्टात त्याच्या वर गुन्हे दाखल आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने तात्काळ आदेश काढून धुळे जिल्हा मध्यवर्ती बॅकेला शेतक-यांवरील केसेस मागे घेण्याचे सांगावे त्याचप्रमाणे सर्व शेतकरीना सरसकट कर्जमाफीचा फायदा मिळावा म्हणजे सरसकट कर्ज माफ व्हावे असे निवेदन दिले.सतत 50 तास तापी नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन करणारे शेतकरी व शिवसैनिकांचे राजुशेट्टी यांनी कौतुक केले.

यांचा होता सहभाग
दयाराम चव्हाण, राजू काळी, शैलेश सोनार, चेतन राजपूत, राजू रगडे ,राकेश राजपूत, बबलू कोळी, संजय मगरे, किरण सावळे, राजधर कोळी, गणेश भदाणे, राकेश कोळी, रमेश शिरसाठ,कैलास पाटील, प्रविण ठाकरे, आबा चित्ते,डॉ प्रविण पाटील, मनोज परदेशी, कैलास ठाकुर, सुमित देशमुख, जगन्नाथ शिरसाठ, भुपेंद्र पाटील, गणेश जावळे ,कैलास जाधव, सागर पाटील, संदीप भोई, हर्षल ठाकूर, अक्षय धनगर, योगेश ठाकूर, भास्कर कोळी, छोटू कोळी, पदमसिंग गिरासे ,विजय सदाराव,सागर बडगुजर, कैलास बोरसे, दिलीप ठाकरे, प्रविण ठाकरे, राकेश बैसाणे ,चेतण साबळे, दयाराम चव्हाण, गणेश कोळी आदींचा सहभाग होता.