दोघा मित्रांना लुटणारे आरोपी पोलीसांच्या ताब्यात

0

जळगाव – मेहरूण तलावावर मित्रासोबत आलेल्या तरूणाला अंधाराचा फायदा घेत तीन ते चार अज्ञात भामट्यांनी पकडून मारहाण करत त्यांच्याजवळील 15 हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणि 1200 रूपये रोख रूपये घेवून फरार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. पोलीसांची चक्रे फिरविल्यानंतर दुचाकीसह दोघांना पकडण्यात यश आले असून इतर दोघे फरार झाले आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, नुतन मराठा महाविद्यालयात बी.एस्सी.त शिकत असलेला शुभम शरद बाविस्कर (वय-24) हे व त्याचा मित्र योगेश गोरख पाटील दोन्ही रा. शिवाजी नगर, जळगाव हे दोघे (एमएच 19 सीबी 4922) या दुचाकीवर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मेहरूण तलावावर फिरण्यासाठी गेले. रात्री 8 वाजता घरी जाण्यासाठी परत आल्यानंतर ग्राफिक्स हॉटेलच्या पुढे शिरसोली रस्त्यावर दोघे आल्यानंतर शौचास जाण्यासाठी हॉटेल समोर असलेल्या अंधारात थांबले. त्याचवेळी अचानक तिन ते चार जण दुचाकीने आल्यावर मारहाण करण्यास सुरूवात केली. शुभम जवळील 15 हजार रूपये किंमती विवो कंपनीचा मोबाईल आणि 1 हजार 200 रूपये रोख असे हिसकावला आणि योगेशच्या खिश्यातून काहीही न मिळाल्याने तिघे-चौघे दुचाकीने पळ काढला. त्यांचा पाठलाग करत असतांना एका मोटारसायकल क्रमांक (एमएच 19 डीसी 2332) असल्याचे दिसून आले. शुभम बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारसायकलच्या नंबरवरून सलीम शे सैय्यद यास ताब्यात घेतले असून तर जखमी आसीफ रोशन शेख यास उपचारार्थ दाख कले आहे. तर शफीख शे. रफीक व सोहेब शे. सलीम हे फरार आहे. दुचाकी जत्प करण्यात आली. ही कारवाई अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, प्रकाश निंबाळकर, किशोर पाटील, शंशीकांत पाटील, चालक सुरेश अहिरे यांनी केली असुन गुन्हा घडल्यापासुन काही वेळात सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. तपास आंनदसिंग करीत आहे.