अहमदाबाद – २००२चा गुजरातमधील गोध्रा हत्याकांड रेल्वे जळीत प्रकरणी दोघा आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. तर तिघा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. एसआयटीच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला. गुजरातमध्ये मध्ये गोध्रा हत्याकांड घडले होते.
या हत्याकांडात अनेक नागरीक मृत्यूमुखी पडले होते. या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या आरोपींची धरपकड वेळीच करण्यातआली होती. प्रकरणाचा तपास जलदगतीने होण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली.