दोडवडे ग्रामस्थांचे जिल्हा परिषदसमोर ठिय्या आंदोलन

0

नंदुरबार । ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी शहादा तालुक्यातील दोडवाडे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता. दोडवाडे ग्रामपंचायतीने घरकुल व रस्ते,तसेच वृक्ष लागवड आदी योजनेत लाखो रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. संबंधितांवर कारवाईसाठी आयुक्तांनी आदेशही दिले आहेत. मात्र, असे असतांना जिल्हा परिषदेचे प्रशासन कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

अधिकारी फिरकेना
चार दिवस लोटूनही एकही अधिकार्‍याने भेट दिली नाही, त्यामुळे आंदोलकांनी कार्तिकी एकादशी जागेवरच साजरी केली आहे. आंदोलकांना अधिकारी धमकावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासन पाणी सोडून हुसकविण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.