दोधे ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार ; जागा परस्पर वाढवली

0

ग्रामसेवकासह सरपंचांवर कारवाईबाबत गटविकास अधिकार्‍यांना निवेदन

रावेर- तालुक्यातील दोधे ग्रामपंचायतीने निष्काळजीपणा करून गावातील एका इसमाला भूखंडाचा क्षेत्रफळ वाढवून दिल्याची तक्रार माजी सरपंच श्रीनिवास पाटील यांनी मंगळवारी गटविकास अधिकार्‍यांकडे केली असून या प्रकारात सरपंचांसह ग्रामसेवकांवर कारवाई न केल्यास उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दोधे ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबद्दल माहिती अशी की, ग्रामपंचायतीने गावातील एका व्यक्तीच्या मालमत्ता क्रमांक 37 चे क्षेत्रफळ पूर्वी 583 चौरस फूट होते परंतु ग्रामपंचायती वाढवून देण्यासाठी अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतीने देखील कोणतीही शहानिशा न करता मनमानी कारभार करून शेजारील रहिवास करणारे माजी सरपंच श्रीनिवास पाटील यांच्या मालकीची मालमत्ता क्रमांक 36 मधील जागा परस्पर मालमत्ता क्रमांक 37 मध्ये 990 चौरस फूट येव्हढी जागा वाढवून दिले आहे. या संदर्भात श्रीनिवास पाटील यांनी येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन संबधीत ग्रामसेवक व सरपंच यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दखल न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत खिरोदा येथील माजी सरपंच गणेश महाजन, संतोष महाजन आदी उपस्थित

तक्रार करूनही समस्या सुटेना
संबधीत ग्रामपंचायतीने अनधिकृत मात्रपरस्पर जागा दुसर्‍याच्या नावे लावल्याचा प्रकार यापूर्वी येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली आहे परंतु काही कारणास्तव दोधे येथील सरपंच व ग्रामसेवक यांना पाठीशी घालण्याचे काम पंचायत समिती करत असल्याचे माजी सरपंच श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.