दोनशे झाडांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण

0
मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
पिंपरी : मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं.चि.शहर, संत भगवान बाबा मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ याच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव घाट, दसरा मैदान (ता. पाटोदा जि.बीड) येथे सुमारे दोनशे झाडांचे सुरक्षा बॅरिकेट जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये 10 फुट उंचीची झाडे लावण्यात आली. लावण्यात आलेल्या या वृक्षांचे ट्रस्टच्यावतीने संगोपन करण्यात येणार आहे. यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे, श्री संत भगवानबाबा मंदिर ट्रस्टचे सुदाम सानप पाटील, जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे, पंचायत समिती सदस्य काकासाहेब लांबरुड, सरपंच राम सानप, सरपंच भागवत वारे, उपसरपंच इंदर सानप, उपसरपंच संजय शिरसाट, इंजि. बडे, रवींद्र केकान, छगन सानप, मुरली मुकादम, तुळशीदास बापु आदी उपस्थित होते.
पर्यावरणाविषयी होते जनजागृती
मराठवाडा जनविकास संघामार्फत गेल्या 7 वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्ष संगोपन आणि पर्यावरणाविषयी जनतेमध्ये जनजागृती केली जात आहे. आतापर्यंत तब्बल अकरा हजार वृक्षांचे बॅरीकेट जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले आहे. यातील सर्व झाडे कशी जिवंत राहतील, यासाठी प्रत्येक महिन्याला 200 कार्यकर्त्यांसह आढावा बैठक घेतली जाते व प्रत्येकाला वृक्षारोपण केलेल्या भागाची जबाबदारी दिली जाते. वृक्षासाठी मोफत पाणी पुरवठा, वृक्षाभोवतीचे गवत काढणे, साफसफाई आदी कामे केली जातात, असे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन संदेश सानप, संतोष सानप, ग्रामपंचायत सदस्य नारायण सानप, बाबासाहेब खाडे, भीमराव सानप, बाबासाहेब सानप, शिवाजी सानप, संदीप सानप, बापूसाहेब सानप, माजी सरपंच राम सानप, रामा सानप, अजिनाथ सानप, अर्जुन सानप, विठ्ठल सानप, महेश सानप, माधव मनोरे, वामन भारगांडे, दत्तात्रय धोंडगे, अनिसभाई पठाण, नामदेव पवार, व्यंकटेश जगदाळे, अमोल पाटील, शंकर तांबे, शिवाजी सुतार, ह.भ.प. राजाभाऊ मोरे, ह.भ.प. गर्जे महाराज, विजय सोनवणे, आश्रुबा पालवे, सतीश आव्हाड, युवराज घोळवे सर, एकनाथ सानप, महादेव बनसोडे, डॉ.दिनेश गाडेकर यांनी केले. प्रास्ताविक संदेश सानप यांनी, तर आभार सरपंच राम सानप यांनी मानले.