निजामपूर । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबवून ‘स्वच्छ भारत स्वस्थ भारत’चा नारा दिला आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्थेमार्फत स्वच्छतेविषयी जनजागृती केली. जनजागृतीचा एक भाग म्हणून ़धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील निजामपुर येथील दोन्ही पायांनी 100 टक्के अपंग असलेला व्यक्ति सृदृढ व्यक्तिला लाजवेल अशी कृती करत आहे. दोन्ही पायांनी अपंग प्रशांत सोनवणे हा चक्क त्याच्याकडे असलेल्या तीनचाकी सायकलीवर बसून हातात झाडू घेऊन संपूर्ण गावातील स्वच्छता करीत आहे. त्यांच्या कृतीतून खर्या अर्थाने स्वच्छते विषयी जनजागृती होत असल्याचे दिसून येत आहे. जन्मतः दोन्ही पायांनी अपंग असल्याने परिवारासाठी तसेच स्वतःसाठी काही करु शकत नाही याची जाण प्रशांतला आहे, मात्र देशासाठी काही तरी केले पाहिजे या हेतूने त्यांनी स्वच्छता करण्याचा संकल्प केला.
मला स्वतःचे घर मिळावे
प्रशांत हा अपंग असतांनाही निस्वार्थपणे गावकर्यांची स्वच्छतेच्या माध्यमातून सेवा करीत आहे. सापसफाईसाठी गावात फिरुन कचरा गावाबाहेर फेकण्याचे कार्य तो करीत आहे. प्रशांतकडे स्वतःचे घर नाही. शासनाने त्यांच्या कार्यांची दखल घेत त्याला शासकीय अनुदानातून घर मिळवून द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मी दररोज दिवसभर गावात स्वच्छता करीत असतो. गावात आमच्या मालकीचे घर नाही, रोजगार नाही, तरी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर आणि आईला संजय गांधी योजनेंतर्गत पेंन्शन मिळावी अशी अपेक्षा त्यांनी बोलून व्यक्त केली आहे.
घरातील एकमेव पुरुष
प्रशांत बापु सोनवणे हा न्हावी समाजाचा आहे. प्रशांतचे वडील बापु जगन्नाथ सोनवणे हे 18 सप्टेंबर 2009 रोजी मयत झाले आहे. त्यात प्रशांत हा अपंग असल्याने कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी आईवर येऊन ठेपली. तीन बहिणीचा प्रशांत हा एकमेव भाऊ आहे. प्रशांतची विधवा आई मोलमजुरी करुन परिवाराचा उदरनिर्वाह करते. चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
डॉ.येवलेंनी दिली सायकल
प्रशांतला चालता येत नसल्याची माहिती निजामपुर येथील डॉ.रमेश वसंत येवले यांना मिळाली. डॉ.येवले यांनी 2014 मध्ये तीनचाकी सायकल घेवुन दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट दिलीत 2 ऑक्टों 2014 ला महात्मा गांधी यांच्या 145 जयंती रोजी स्वच्छ भारत अभियानाला सुरु वात केली. हे अभियान 2019 प्रयत्न पुर्ण करण्याची संकल्प देशासमोर ठेवली व मन की बात रेडिओ वर मोदींना स्वच्छ बाबत भाषणे देवून देशाला संबोधीत करतात. त्यातून प्रेरणा घेऊन प्रशांतने हे कार्य सुरु केले आहे.