जळगाव। रावेर शहरात सन 2012 मध्ये दंगल उसळली होती. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू या गुन्ह्यातील दोन संशतिय हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जेरबंद केले असून त्यांना पूढील कारवाईसाठी रावेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
घटनेच्या दिवसापासून संशयित फरार
2012 मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीबाबत रावेर पोलीस ठाण्यातभादवी 302,307,143,147 प्रमाणे तसेच भादवी 307,324,341,295 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला तेव्हापासून सय्यद रिजवान सय्यद मेहमूद पटवेकर (वय 27, रा.विवरा ता. रावेर) व सय्यद अझर सय्यद मजहर (वय 30, रा.फुकटपूरा) हे दोन्ही गुन्ह्यातील संशयित फरार झाले होते. यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी या गुन्हयातील फरार संशयित आरोपींचा शोधण्यासाठी मोहिम राबविण्याच्या सुचना केल्या होत्या.
यांनी केली कारवाई
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पाप्रन्रि राजेशसिंह चंदेल यांनी स.फौ.मनोहर देशमुख, पो.हे.कॉ.दिलीप येवले, अशोक चौधरी, पोना गफुर तडवी,रमेश चौधरी, योगेश पाटील, मिलिंद सोनवणे, रामकृष्ण पाटील, मनोज दुसाने,सुशिल पाटील, प्रकाश महाजन, महेश पाटील,चालक पोहेकॉ. इद्रीस पठाण यांचे पथक तयार करून रावेर, यावल, मुक्ताईनगर, बर्हाणपूर या ठिकाणी शोध घेण्यासाठी पाठविले होते. या पथकाने संशयित आरोपी सय्यद रिजवान सय्यद मेहमूद पटवेकर व सय्यद अझर सय्यद मजहर यांना 20 रोजी जेरबंद केले. यानंतर त्यांना रावेर पोलीस ठाण्यात पुढील कारावाईसाठी हजर केले आहे.