नवापूरजवळ मुंबईच्या भरारी पथकाची कारवाई
नंदुरबार- महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवरील एका शेतात धाड टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने हरियाणा निर्मित सुमारे दोन कोटी रुपयांचा मद्य साठा पकडला आहे. या वर्षाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याने मद्य साम्राटांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नवापूर तालुक्यातील सुकवेल गावाच्या एका शेतातील घरात हरीयाणा राज्यातील बनावटीचा मोठ्या प्रमाणावर दारू साठा विक्रीसाठी लपवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मुंबई आयुक्त डॉ.अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणावर दारू साठा आढळून आला. त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर, नंदुरबार येथील भरारी पथकाने संयुक्त रित्या ही कारवाई केली.